अण्णांच्या आंदोलनासंबंधी राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे मोठे विधान

January 26, 2021 0 Comments

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक यांना एरवी दुर्लक्षित करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या आताच्या आंदोलनाच्या वेळी मात्र पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. नगरचे पालकमंत्री यांनी यासंबंधी मोठे विधान केले आहे. अण्णा हजारे यांच्यासह शेतकऱ्यांसाठी जे कोणी आंदोलने करत आहेत, त्यांना आमचा पाठिंबा राहील, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ( on Agitation) वाचा: एकीकडे दिल्लीत कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे हजारे यांनीही ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हजारे यांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या नेत्यांची धावपळ सुरू आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही राळेगणसिद्धीत येऊन हजारे यांच्याशी चर्चा केली. मात्र, हजारे आंदोलन करण्यावर ठाम आहेत. यातून केंद्र सरकार आणि भाजपपुढील अडचणी वाढल्याचे दिसून येते. आता आंदोलनासाठी चार दिवसच शिल्लक राहिलेले असताना अद्याप काहीही तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ नगरमध्ये आलेले असताना पत्रकारांनी त्यांना शेतकरी आंदोलनाविषयी भूमिका विचारली. त्यावर दिल्लीतील आणि मुबंईत झालेल्या आंदोलनाची माहिती देत मुश्रीफ यांनी हजारे यांच्या आंदोलनालाही राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचे म्हणाले. त्यानंतर थोडे सावरून घेत ते म्हणाले, ‘दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे व हजारेही शेतकऱ्यांसाठी उपोषण करीत आहेत. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या प्रत्येकाला आमचा पाठिंबा असेल. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे चर्चा न करता केलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. अण्णा हजारेही शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन उपोषण करणार आहेत, त्यामुळे त्यांना आमचे समर्थन आहे. शेतकर्‍यांसाठी लढणारांना आमचा पाठिंबा असेल,’ असेही ते म्हणाले. वाचा: आतापर्यंतच्या अनुभवानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हजारे यांच्याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून येते. हजारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर मतभेद आणि संघर्ष झाल्याचीही उदाहरणे आहेत. या पार्श्वभूमीवर आणि बदलत्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादीची हजारे यांच्याबद्दल बदलती भूमिका लक्षवेधी ठरत आहे. वाचा:


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: