काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा कोणाकडे? अशोक चव्हाण म्हणतात...
मुंबईः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी आपल्यावरील अतिरिक्त जबाबदाऱ्या असल्यामुळं प्रदेशाध्यक्षपदाचा भार कमी करावा, अशी इच्छा काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर सोपवणार याविषयी तर्क- वितर्क लढवले जात असतानाच काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीच्या संदर्भात काँग्रेसच्या मुख्य नेत्यांसोबत ते चर्चा करणार असून आज सकाळी त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे. त्यावेळी या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेबाबत अशोक चव्हाणांनी भाष्य केलं आहे. 'एच. के पाटील हे महाराष्ट्रातील आमदारांना भेटणार आहेत. प्रदेशाध्यक्षांबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. आगामी निवडणूकांसाठी पूर्वतयारी कशी असावी, यावर सध्या अधिक भर दिला जात आहे. त्या अनुषंगाने आज चर्चा झाली. एका व्यक्तीकडे एकच पद असावं की नाही याबाबत निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील,' असं स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिलं आहे. 'राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आज चर्चा झाली आहे. आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. त्याचबरोबर, आमदारांच्या मतदारसंघात पुरेसा निधी मिळत नाही, याबाबत पाटील यांनी आज मते जाणून घेतली आहेत. येत्या काळात त्यावरही चर्चा होईल,' असंही ते म्हणाले आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: