पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग

January 21, 2021 0 Comments

पुणेः करोना लसीकरणामुळं सध्या चर्चा सुरु असलेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्युडच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. या इमारतीत अडकलेल्या चार कर्मचाऱ्यांपेकी तिघांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे, तर, एका कर्मचाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. मांजरी येथे सीरम कंपनीमध्ये कोव्हिशिल्ड किंवा बीसीजीच्या प्लांटला आग लागली नाही. बीसीजी प्लांटच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम सुरु नाही. केवळ त्या ठिकाणी इन्स्टॉलेशन सुरु आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड किंवा बीसीजीच्या प्लांटला कोणताही धोका नाही, असे सीरम कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आगीच कारण अद्याप अस्पष्ट असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती त्याच इमारतीत ही आग लागलेली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, करोनाची लस सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात येत असल्याने सर्व यंत्रणांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. गुप्तचर यंत्रणेने ही आग शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे की अन्य काही कारणांमुळे याचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: