रेखा जरे खून: बाळ बोठेचा पत्ता लागेना; पोलिसांनी आता उचललं 'हे' पाऊल

January 01, 2021 0 Comments

नगर: ' 'च्या अध्यक्षा यांच्या खून प्रकरणातील फरार असलेला मुख्य आरोपी पत्रकार याला अटक करण्यासाठी पोलिसांना ‘स्टँडिग वॉरंट’ हवे आहे. त्यासाठी पोलिसांनी पारनेरच्या न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. असे वॉरंट मिळाल्यानंतर पोलिसांना राज्यात आणि अन्य राज्यांतही आरोपीचा शोध घेण्यास मदत होणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली. ( ) वाचा: रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बोठे गेल्या महिन्याभरापासून फरार आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पाच पथके नियुक्त केली असली तरी त्यांना अद्याप बोठेचा ठावठिकाणा लागलेला नाही. सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटळाला आहे. त्याच्यावतीने उच्च न्यायालयातही अपील करण्यात आलेले नाही. तर दुसरीकडे शोध घेऊनही तो सापडत नाही. त्यामुळे आता पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अटकेसाठी स्थायी वॉरंट मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होईल. बोठेचा पोलिसांनी ४० ठिकाणी शोध घेतला. नगर जिल्हा तसेच अन्य जिल्ह्यांतही पोलिस जाऊन आले. मात्र तो मिळू शकलेला नाही. पोलिसांच्या हाती अनेक पुरावे लागलेले आहेत. तसेच अनेकांचे जबाब घेण्यात आलेले आहेत. सर्व माहिती पारनेर न्यायालयात अर्जासोबत देण्यात आली आहे. वाचा: पोलिसांचा हा अर्ज मंजूर झाला तर आरोपीला पकडण्याचे काम वेगाने होऊ शकते. न्यायालयाचे हे वॉरंट सर्व पोलिसांना पाठविण्यात येईल. त्यामुळे नगरच नव्हे तर अन्य कोठेही तेथील पोलिसांना आरोपी दिसला, त्याच्या वास्तव्याची माहिती मिळाली तर ते पोलिसही आरोपीला अटक करू शकतात. याशिवाय आरोपीचा फोटो आणि माहितीच्या आधारे नागरिकांनाही आवाहन करता येऊ शकते. सापडत नसलेल्या आरोपीला पकडण्यासाठी ही एक प्रक्रिया असते. यापुढे जाऊन सीआरपीसी ८२ नुसार मालमत्ता जप्तीची कारवाई नंतर सुरू केली जाऊ शकते. त्यापूर्वी ही सर्व प्रक्रिया करावी लागत असल्याचे कायदेतज्ज्ञांनी सांगितले. दरम्यान, या अगोदर पोलिसांनी जरे यांच्या घराची तीन-चार वेळा झडती घेतली आहे. यामध्ये बरीच माहिती आणि पुरावे ठरतील अशा गोष्टी पोलिसांच्या हाती आल्या आहेत. बोठे याच्या घराची झडती पोलिसांनी अगोदरच घेतलेली आहे. आतापर्यंतच्या तपासात बऱ्याच गोष्टी उघड झाल्याचे पोलिसांना सांगितले. वाचा:


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: