'कोहिनूर-ए-गझल' इलाही जमादार यांचे निधन

January 31, 2021 0 Comments

पुणेः आपल्या लेखणीनं मराठी गझलविश्व समृद्ध करणारे इलाही जमादार यांचे वृद्धापकाळानं निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. सांगलीतील मुळ गावी त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार होणार आहेत. जमादार यांचा जन्म १ मार्च १९४६ रोजी सांगलीतील दुधगाव येथे झाला होता. मात्र, ते पुण्यात वास्तव्यास होते. १९७०च्या आसपास सुरेश भटांनी उर्दू गझलेला मराठीत अढळ स्थान प्राप्त करुन दिल्यानंतर मराठी गझल विश्वात यांचे नाव घेतले जाते. इलाही जमादार यांच्या गझला या महाराष्ट्रासोबतच देशभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काव्यवाचनाचे कार्यक्रमाचे कार्यक्रमांनाही प्रेक्षकांची अलोट गर्दी असायची. त्याचबरोबर, अकाशवाणी, दुरदर्शनसोबतही त्यांनी काम केलं आहे. वाचाः नवोदित मराठी कवींसाठी गझल कार्यशाळाही घेत होते. वाचलेली माणसे गेली कुठे, हे असे बागेवरी उपकार केले, अनाथ होईल वेदना जगी माझ्यानंतर या त्यांच्या काही प्रसिद्ध गझल होत्या. वाचाः दरम्यान, काही वर्षांपूर्वी तोल जाऊन पडल्यामुळं त्यांच्या डोक्याला मार लागला होता. तसंच, त्यांना स्मृतीभ्रंशाचा आजारही जडला होता. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचारही सुरु होते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: