मुंबईत डिसेंबरमध्ये सर्वाधिक घर विक्री; आकडा पाहून हैराण व्हाल

January 01, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाने झाकोळलेला हळूहळू नव्या उमेदीने नवनवीन शिखरे गाठण्याच्या टप्प्यावर पोहोचले आहे. मुंबईत नोव्हेंबरपाठोपाठ डिसेंबरमध्येही मोठ्या प्रमाणात झाली आहे. ३१ डिसेंबरच्या दुपारपर्यंत १९,२२० घरांची विक्री झाली आहे. तर, २८ ते ३१ डिसेंबर या चार दिवसांतच तब्बल ३,४२५ घरांसाठी नोंदणी झाली आहे. मुंबई ही इतर व्यवसायांप्रमाणेच बांधकाम क्षेत्राच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर बांधकाम क्षेत्रदेखील बाधित झाले. सुरुवातीच्या कालावधीत घरांची नोंदणी रोडावली असतानाच नवीन प्रकल्पदेखील उभे राहिले नाहीत. त्यानंतर हळूहळू परिस्थिती बदलत गेली असून उभारले जात असतानाच घरांची मागणीदेखील वाढत आहे. त्याचवेळी, घट केलेल्या मुद्रांक शुल्कात १ जानेवारी २०२१ पासून १ टक्का वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने डिसेंबर अखेरीस घरांच्या नोंदणीत भर पडली आहे. सरत्या २०२० मध्ये विक्री झालेल्या सर्व घरांचे अंदाजे मूल्य सुमारे १ लाख कोटी रुपयांपर्यंत आहे. सन २०१९ मध्ये विक्री झालेल्या घरांच्या विक्रीचे मूल्य ९०,७६९ कोटी रु. एवढे होते. संपूर्ण मुंबईत २५ डिसेंबरपर्यंत नोंदविल्या गेलेल्या घरांची सरासरी जवळपास ५८५ इतकी आहे. तर, केवळ २७ ते ३० डिसेंबरपर्यंत घरांची नोंदणी दुपटीने वाढून १,११९ इतकी झाली. ही वाढ सकारात्मक असल्याने २०२१ मध्ये देखील घरांच्या विक्रीत मोठी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नाईट फ्रँक कन्सल्टन्सीने घेतलेल्या आढाव्यानुसार घरांच्या विक्रीत वाढ होत आहे. परिणाम राज्याच्या खजिन्यावर राज्याच्या तिजोरीत घरांच्या नोंदणीतून मुद्रांक शुल्काच्या रूपात मोठी भर पडत असते. यावेळी करोनाने त्यावर परिणाम झाला. तरीही मुद्रांक शुल्कात कपात करण्याच्या निर्णयाने सध्या घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. सन २०२० मध्ये घरांच्या नोंदणीतून राज्याच्या तिजोरीत सुमारे ३,१०७ कोटी रु. महसूल जमा झाला. त्यातील १,३५० कोटी रु. म्हणजेच ४३ टक्के महसूल हा डिसेंबर २०२० मध्ये प्राप्त झाला आहे. तर, १ जानेवारी ते ३० ऑगस्ट २०२० या कालावधीत १,७५६ कोटी रु. जमा झाले आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: