परळीत भाजपला धक्का; धनंजय मुंडेंचा दणदणीत विजय

January 18, 2021 0 Comments

परळीः राज्याचे सामाजिक न्यायमंत्री हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर होणाऱ्या आरोपानंतर परळी ग्रामपचांयतीवर काय परिणाम होतो याकडं सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र, पुन्हा एकदा परळीकरांनी धनंजय मुंडे यांच्यावर विश्वास दाखवला असून परळीत ६ जागांवर धनंजय मुंडे यांच्या गटानं दणदणीत विजय मिळवला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या कथित बलात्काराच्या आरोपांमुळं या सगळ्याचा परिणाम निवडणुकांवर होणार का, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु, धनंजय मुंडे यांना आपला गड राखण्यात यश आलं आहे. परळीतील एकूण ८ ग्रामपंचायतींपैकी ६ ग्रामपचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता राखली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा विजय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. वाचाः दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावात शिवसेनेनं सत्ता मिळवली आहे. शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची मदत होती. मात्र, शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांनी या युतीविरोधात कडवी झुंज देत शिवसेनेचा विजय खेचून आणला आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या गटाला काठावर विजय मिळाला आहे. एकूण ११ पैकी ६ जागांवर खडसे समर्थकांनी बाजी मारली. तर उर्वरित ५ जागांवर खडसेंचे पारंपरिक राजकीय विरोधक शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील समर्थक निवडून आले आहेत. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: