लसीकरणानंतरही काय खबरदारी घ्याल?; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

January 02, 2021 0 Comments

जालनाः करोना प्रतिबंधक लसीकरणाची रंगीत तालीम आज पुणे, नागपूर, जालना व नंदूरबार या चार जिल्ह्यातील प्रत्येकी तीन आरोग्य केंद्रावर करण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री यांच्या उपस्थितीत जालनातील आरोग्य केंद्रात आज करोना लसीकरणाचं ड्रायरन करण्यात आलं. या वेळी आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांच्या करोना लसीकरणाच्या अनेक शंकांच निरसन केलं आहे. लसीकरणानंतरही काय काळजी घ्यावी, याची महत्त्वाची माहिती टोपे यांनी दिली आहे. राज्यात चार टप्प्यांत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची पूर्वतयारी म्हणून लसीकरणाची रंगीत तालीम () देशभरात राबविण्यात येत आहे. 'करोना लसीकरणानंतर प्रत्येकाला चार सूचना केल्या जातील. लसीकरणाच्या पुढच्या डोसची तारीख त्यांना देण्यात येईल. त्यानंतर, लसीकरणानंतरच्या काळात त्यांना कसं वागावं याच्या सूचना करण्यात येतील, असं सांगतानाच राजेश टोपे यांनी लस घेतली म्हणजे करोनामुक्त झालो अशा गाफिलपणा बाळगू नका. लसीकरणानंतरही सोशल डिस्टनसिंग आणि मास्क बंधनकारक असणार आहे. लसीचे परिणाम जाणवायला दोन ते चार महिने लागू शकतात,' अशा सूचना राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. 'लस घेतल्यानंतर काही जणांना थोडाफार परिणाम जाणवू शकतो, त्यांना अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल, जर कोणाला काही त्रास जाणवलात तर रुग्णालयात दाखल केलं जाईल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. एका बूखवर शंभर जाणांना लसीकरणाचे नियोजन केले जाईल. यासाठी ओळखपत्र आणि करोना लस अॅपची पडताळणी करणारे पोलिस कर्मचारी, शिक्षक आणि मग लसीकरण केंद्र असे टप्पे नागरिकांना पार करावे लागणार,' असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: