कोल्हापूर: शिक्षण संस्थेविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना कोंडले

January 03, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, संस्थाचालकांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिक्षकांनाच कोंडून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. नूतन आमदार प्रा. यांनी या शिक्षकांची सुटका केली. शिक्षकांना कोंडलेल्या या प्रकरणाची शहरात जोरदार चर्चा सुरू होती. कोल्हापुरातील जयभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव व संस्थेतील शिक्षक यांच्यात गेले काही दिवस वाद सुरू आहे. जाधव यांच्यावर अरेरावीचा आरोप करत हे शिक्षक रस्त्यावर उतरले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक संघटनाही संस्थेत गेल्या. त्यावेळी संस्थाचालक व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधीमध्ये जोरदार वाद झाला. याच दरम्यान, शिक्षकांनी संघटनांना काहीही माहिती देऊ नये म्हणून शिक्षकांना एका वर्गात कोंडून घातल्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे गोंधळात आणखीन भर पडली. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी शाळेत जाऊन शिक्षकांची सुटका केली. तसेच याप्रकरणी संस्थाचालकांना खडेबोल सुनावले. दोन तासहून अधिक वेळ गोंधळ सुरू होता. वाचा: याप्रश्नी सर्व शिक्षक व नागरी संघटना कृती समितीचे पदाधिकारी शनिवारी सकाळी संस्थेच्या कार्यालयावर मूकमोर्चा काढला. शाळेसमोर मोर्चा येताच माध्यमिक शाळेतील काही शिक्षकांना संस्थाचालकांनी ते शिक्षक आंदोलनात सहभागी होऊ नयेत म्हणून कोंडून ठेवल्याचे कृती समितीला समजले. दरम्यान, संस्थेच्या उपाध्यक्ष व माजी मुख्याध्यापिका सुमित्रा जाधव यांनी सांगितले की, ‘माध्यमिक शिक्षकांना शाळेत कोंडले नव्हते. पोलिसांच्या सुचनेनुसार त्यांना शाळेच्या आवारातच थांबायला सांगितले होते. सगळेजण गेटच्या आतील बाजूला होते. शिवाय शाळेतील शिक्षकांकडून संस्थाचालकावर जे आरोप केले आहेत, त्यामध्ये तथ्य नाही.’ शिक्षक उभे राहिले शिक्षकांच्या पाठिशी श्रीधर सावंत विद्यामंदिरमधील शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक त्यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. कोल्हापूर जिल्हा शैक्षणक व्यासपीठाचे एस. डी. लाड, संस्थाचालक संघटनेचे वसंतराव देशमुख, शिक्षक नेते दादासाहेब लाड, राजाराम वरुटे, खंडेराव जगदाळे, भरत रसाळे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, संजय पाटील, संजय कडगावे, राजेश वरक, संतोष आयरे, राजेंद्र कोरे, विलास पिंगळे, सी. एम. गायकवाड, सुनील गणबावले, मनोहर सरगर, दिलीप माने, कृती समितीचे पदाधिकारी अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत पाटील, संभाजी जगदाळे, लहू शिंदे, अंजूम देसाई, शिक्षक संघटनेचे आनंदा हिरुगडे, अजित पाटील, गजानन काटकर, सुधाकर निर्मळे, कुमार पाटील, द्रोणाचार्य पाटील, अनिल सरक, टी. आर. पाटील, महादेव डावरे यांच्यासह शहरातील विविध शाळेतील शिक्षकांचा आंदोलनात सहभाग होता. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: