पुणे अखेर कंटेन्मेंटच्या जोखाडातून मुक्त; १० महिन्यांनंतर 'असं' प्रथमच घडलं

January 01, 2021 0 Comments

पुणे: करोनाच्या विळख्यात सापडलेल्या शहराची करोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली असून त्याची नांदी म्हणजे आज पुणे कंटेन्मेंट झोनमुक्त झालं आहे. शहरात आता एकही उरलेला नसून मार्च महिन्यानंतर प्रथमच असं घडलं आहे. ( Update ) वाचा: राज्यातील करोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला होता. दुबई येथून परतलेल्या दाम्पत्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. नंतर मुंबईसह राज्यात सर्वत्र संसर्ग पसरला. सुरुवातीला मुंबई हा करोनाचा हॉटस्पॉट बनला होता. मात्र नंतर राज्यातील करोना साथीचा केंद्रबिंदू पुण्याकडे सरकला. पुण्यातील मृत्यूदरही मोठा असल्याने चिंता अधिकच वाढली होती. मात्र, आरोग्य यंत्रणांचे अथक प्रयत्न, पालिका व शासनाने उपलब्ध केलेल्या आरोग्य सुविधा यामुळे करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुकारलेल्या लढ्याला बळ मिळत गेलं. वाचा: मुख्यमंत्री यांनी थेट पुण्यात जाऊन तेथील स्थितीचा आढावा घेतला होता. त्याचवेळी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री यांनी पुण्यात बारकाईने लक्ष देत सर्व यंत्रणांना वेळोवेळी सूचना दिल्या तसेच या लढ्यात कोणतीही उणीव भासू दिली नाही. करोनावरील उपचारांत कोणतीही कुचराई होऊ नये म्हणून पुण्यात जंम्बो आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या. लॉकडाऊन तसेच सोशल डिस्टन्सिंगबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून पोलीस यंत्रणेनेही झोकून देऊन काम केले. या साऱ्याचा परिपाक म्हणून पुण्याची वाटचाल आता करोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. करोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने कालच पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उद्यापासून (१ जानेवारी) या कोविड सेंटरमध्ये नवीन रुग्ण दाखल करून घेतले जाणार नाहीत. या बातमीनंतर आज कंटेन्मेंट झोनबाबतची बातमी आणखी दिलासा देणारी ठरली आहे. पुणे महापालिका हद्दीत आता एकही कंटेन्मेंट झोन नसून पुणे कंटेन्मेंट झोनमुक्त शहर बनलं आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले. वाचा: दरम्यान, डिसेंबरच्या सुरुवातीला पुण्यात ६ कंटेन्मेंट झोनची घोषणा करण्यात आली होती. त्याआधी नोव्हेंबरमध्ये ही संख्या १३ होती तर ऑक्टोबरमध्ये पुण्यात ३३ कंटेन्मेंट झोन होते. त्याआधी करोना साथीने थैमान घातले असताना कंटेन्मेंट झोनची संख्या १०० पर्यंत गेली होती. ...म्हणून जम्बो कोविड सेंटर बंद करणार पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मैदानावर जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. मात्र, रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याने हे सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कालच विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले होते. 'जम्बो सेंटर हे तात्पुरते उभारण्यात आले होते. आता करोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. शिवाय पुणे महापालिकेचे नायडू रुग्णालय, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील यशवंतराव चव्हाण रुग्णालय; तसेच बाणेर-बालेवाडी आणि ऑटो क्लस्टर येथील सेंटरमध्येही रुग्णांचे प्रमाण कमी आहे. या ठिकाणी करोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशा खाटा उपलब्ध आहेत. त्यामुळे जम्बो सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे', असे राव यांनी स्पष्ट केले होते. सध्या या कोविड सेंटरमध्ये १५० करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून हे रुग्ण बरे झाल्यानंतर जम्बो सेंटर पूर्णपणे बंद केले जाणार आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: