Aurangabad Renaming Row: मनसे आक्रमक; औरंगाबादचे असे केले छत्रपती संभाजीनगर!

January 06, 2021 0 Comments

नगर: शहराचे नामांतर करण्यावरून आरोपप्रत्यारोप सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नगरमध्ये प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी औरंगाबादच्या एसटी बसवर अशा नावाचे स्टीकर लावण्यात आले. ( Latest News Update ) वाचा: नगरमधील स्वस्तिक बस स्टँडवर दुपारी मनविसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. विशेष म्हणजे यासाठी त्यांना कोणीही विरोध केला नाही. यामध्ये मनविसेचे जिल्हाध्यक्ष , अनिकेत शियाळ, संकेत जरे, सुमित शिर्के, हामजा शेख, दिपक मगर, योगेश चंगेडिया, प्रमोद जाधव असे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांना नगरमधून औरंगाबादला जाणाऱ्या एसटी बसेसवर संभाजीनगरचे फलक लावत छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष केला. वाचा: याबद्दल आपली भूमिका व्यक्त करताना वर्मा म्हणाले, औरंगाबादच्या नामांतराचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत केंद्र व राज्य सरकारही बोटचेपी भूमिका घेत आहे. नागरिकांच्या भावनांचा विचार करता संभाजीनगर नाव होणे गरजेचे आहे. आज अनेक योजनांना, चौकांना सत्ताधारी व विरोधक आपआपल्या नेतृत्वाचे नाव देत आहेत, परंतु नागरिकांच्या भावनांचा आदर करुन ‘छत्रपती संभाजीनगर’ हे नामांतर होणे गरजेचे आहे. याबाबत मनसेने वेळोवेळी पाठपुरवठा केला परंतु त्याबाबत कोणताही निर्णय होत नाही. म्हणून आज नगरमध्ये औरंगाबादला जाणाऱ्या गाड्यांवर ‘छत्रपती संभाजीनगर’ नावाचे फलक चिकटविले आहेत. याची दखल घेऊन लवकरात लवकर नामांतर व्हावे, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा वर्मा यांनी दिला. वाचा:


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: